उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या वडगाव सिध्देश्वर येथील श्री सिध्देश्वरांच्या दर्शनासाठी केवळ श्रावणमासातच नव्हे तर वर्षातील बाराही महिने भाविकांची गर्दी असते़.

सिध्देश्वर मंदिराबाबत एक अख्यायिका सांगितली जाते़ वडगाव परिसरात पूर्वी इसापूर नगरी होती़ इसापूर नगरीच्या राजाकडे अनेक गायी होत्या़ गायी वनात चरण्यासाठी सैनिक नेत असत़ मात्र, यातील एक गाय आपल्या वासराला दूध पाजत नव्हती़ गाय दूध का पाजत नाही, याची माहिती घेण्यासाठी राजाने सैनिकांना सांगितले होते़ सैनिकांनी त्या गायीवर नजर ठेवली असता, ती गाय एका वारूळावर दूध सोडत असल्याचे दिसून आले़ याची माहिती मिळताच राजाने उत्सुकतेने त्या वारूळाच्या जागी उत्खनन केले़ त्यावेळी शंभू महादेवाच्या जवळपास सात पिंडी तेथे आढळून आल्या़ राजाने काही दिवसातच तेथे भव्य मंदिर उभारून परिसराचा जीर्णोध्दार केला़ तेव्हापासून आजपर्यंत परिसरातील हजारो भाविक सोमवारसह शिवरात्री, श्रावण मासात दर्शनासाठी वडगाव येथे येतात़ इसापूर राजाची मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या नागझरी कुंडाजवळ समाधीही आहे़.

 

 
Top