तुळजापूर / श्रीकांत कदम -

 तिर्थक्षेञ तुळजापूर च्या पायथ्याशी असणाऱ्या सिंदफळ स्थित घनदाट अरण्यात बाराशे वर्षापुर्वी मुदगल रुषीने देविचा नामाचा जप केला असता तिथे स्वयंभु असे महादेव पिंड  सापडली  या पविञ स्थानी अवतरलेल्या  श्रीमुदगुलेश्वर  शंभु महादेव दर्शनासाठी महाशिवराञी व दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते 

 


महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीराचा पायथ्याशी असणाऱ्या सिंदफळ परिसरात श्रीमुदगुलेश्वर शंभुमहादेवाचे अतिप्राचीन घनदाट अरण्यात मंदीर असुन या मंदीरात जाण्यास पुर्वी वाट नव्हते काही काळानंतर येथे ग्रामस्थ घनदाट अरण्यात गेले असता तिथे शंभुमहादेव पिंड सापडली त्यानंतर त्याची पुजा अर्चा करु लागले काहीनी नवस बोललाअसता तो पुर्ण झाल्याने भाविकांनी हैमाडपंथी मंदीर उभारले

आजही हे मंदीर घनदाट झाडीत असुन असुन मंदीर समोर अखंड पाण्याच्या  ओडा वाहतो श्रीमुदगुलेश्व दर्शनार्थ गेले असता घनदाट अरण्यात आल्याचा  भास होतो आज बावीसाव्या शतकात ही येथे मोर लाडोर सह विविध प्राणी पक्षीयांचा वावर असुन दर्शनासाठी आलेल्या भक्तांना या पक्षांचा मधुर स्वर कानी पडतो 

श्रीमुदगुलेश्वर मंदीर मुर्ती पाषाणाचा आहे नवसपुर्ती पोटी भक्त जल अभिषेक करतात व नंतर भात शिरा पेढा लोणी खव्याने महादेव मुर्तीस लिंपुन नवसपुर्ती केली जाते


 
Top