उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील येडशी गावात बालाघाटात  निसर्गरम्य पर्यावरणात वसलेले रामलिंग मंदिर आहे. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे या स्थानाला मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते.   पावसाळ्यात पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला असतो. रामलिंग मंदिराच्या  भोवती वळसा घालून जाणाऱ्या नदीमुळे हे  स्थळ आणखीनच मनमोहक िदसते. याच ठिकाणी जटायुने सितेला घेऊन जाणाऱ्या रावणाचा मार्ग रोखला होता. त्यानंतर रावण व जटायुतमध्ये युध्द झाले. अशी अख्यायीका आहे. 

    रामलिंग नाव कसे पडले?

 रामलिंग हे नाव या ठिकाणाला कसे पडले याचा उल्लेख रामायणाशी आहे. प्रभू रामचंद्राच्या नावावरून या ठिकाणाला रामलिंग मंदिर हे नाव पडले. प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षांच्या वनवासाचा प्रवास करत होते तेव्हा रावणाने सीतामाताचे अपहरण करून त्यांना आपल्या सोबत बालाघाटाच्या याच मार्गाने लंकेच्या दिशेने घेऊन जात होता. तेव्हा जटायू पक्षाने रावणाचा मार्ग याच ठिकाणी अडवला. परंतु रावणाच्या शक्ती पुढे जटायू पक्षाची शक्ती कमी पडली आणि जटायू पक्षी घायाळ झाला. घायाळ जटायूला तिथेच सोडून रावण मात्र सीता मातेला सोबत घेऊन लंकेच्या दिशेने पुढे गेला. नंतर सीतेच्या शोधात प्रभू रामचंद्र लक्ष्मणासोबत याच ठिकाणी पोहोचले तर त्यांना जटायु पक्षी जखमी अवस्थेत आढळून आले. 

 रामाने बाण मारून पाणी काढलं

 जटायू पक्षाने जखमी अवस्थेत प्रभू रामचंद्राला रावणाचा मार्ग व घडलेल्या प्रसंग सांगितला, तेव्हा प्रभू रामचंद्राने एका जागेवर बाण मारून पाणी काढलं आणि जटायूला पाणी पाजले होते. आज त्याच ठिकाणाला रामबाण म्हणून ओळखले जाते. आजही पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रवाह उसळत असतो. येथे असलेले महादेवाच्या मंदिराला रामाने भेट दिल्यामुळे या ठिकाणाला राम मंदिर असे नाव पडले.


 
Top