परंडा /प्रतिनिधी: -

 सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहेमतुल्लाह यांचा ७०३ वा उरुस मंगळवारी दि.३१ रोजी साजरा झाला.उर्स निमित्त येथिल तहसिल कार्यालयातून मोठ्या उत्साहात संदल मिरवणुक काढण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन  वर्षानंतर ऊर्स यात्रेला  महाराष्ट्राच्या विविध भागातून भावीक हजारोच्या संख्येने शहरात दाखल झाले होते. "हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन की चारो दीन'' च्या उदघोषात अख्खे परंडा शहर दुमदुमून निघाले. 

        उरूस संदल मिरवणुकीची सुरुवात येथिल तहसील कार्यालयातून करण्यात आली. फोतेहखानी झाल्यानतंर मानाची चादर  तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या डोक्यावर देण्यात आली. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, पोलीस निरीक्षक अमोद भुजबळ, उद्योजक काका साळुंके,माजी अध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, रिपाई प्रदेश चिटणीस संजय बनसोडे, उद्योजक राजाभाऊ शेळके, तौफीक मुजावर, संपादक निसार मुजावर, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, भाजपा जिल्हा संघटक विकास कुलकर्णी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष वाजिद दखनी, संजय महाराज पुजारी,  शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील, उर्स कमेटीचे अध्यक्ष सलीम मुजावर, माजी परिषद अध्यक्ष शंकर इतापे, मतीन जिनेरी, नदीम मुजावर, युनुस आलम सिद्दीकी, मैनुद्दीन तुटके, माजी जिप सदस्य सिध्देश्वर पाटील, अमजद मुजावर, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष समाधान खुळे, डॉ अब्बास मुजावर, एजाज मुजावर, मसरत काजी,  पप्पु पठाण, नबावोद्दीन मुजावर, माजी नगरसेवक सर्फराज कूरेशी, समाजसेवक शरीफ तांबोळी, पिंपरी - पुणे येथील वंचीत आघाडी शहराध्यक्ष चद्रकांत धोडे, माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख, माजी नगरसेक मकरंद जोशी आदी उपस्थित होते. तहसील कार्यालयात उरूस कमेटीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  सत्कारानतंर संदल मिरवणुकीला ढोल ताश्याच्या गजरात  तहसिल कार्यालयातून सुरुवात झाली. येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मस्तान ग्रुपच्या वतीने कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सादर केलेल्या आकर्षक कव्वाल्या भाविकांचे मन जिंकून जात होत्या. दरम्यान टिपू सुलतान चौकात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  तत्पुर्वी संदल मिरवणुक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक मार्गे टिपु सुलतान, मंडईपेठ, जुनी आडतलाईन, महात्मा फुले चौक, कुराड गल्ली, कुरेशी गल्ली मार्गे सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहेमतुल्लाह यांच्या दर्गाह येथे पोहचली. त्या ठिकाणी मानाच्या घोडयाने दर्गाहच्या पायऱ्या क्षणात पार करून हजरत खाँजा बद्रोदीन यांच्या समाधीसमोर उभे राहून सलामी दिली. या वेळी दुतर्फा उभा राहिलेल्या भाविकांनी हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन की चारो दिन च्या उदघोष केला. हा क्षण पाहण्यासाठी दर्गाह येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी उमडली होती.  यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. संदल मिरवणुकीमध्ये पुणे, बारामती, वैराग, बार्शी, करमाळा, पाटोदा येथिल बॅन्ड पथके सहभागी झाले होते. तर जामखेड, उस्मानाबाद, मुंबई येथिल ढोलीबाजा पथकांनी ढोल ताश्याच्या संगीत सादरीकरणातून शहरवाशीयांना मंत्रमुग्ध केले. तत्पुर्वी सकाळी ९ वाजता शहरातील बाडीवाले यांच्या वाडयावरुन ढोल ताश्याच्या गजरात सोनेरी कलशाची मिरवणुक काढण्यात आली होती. कलशाच्या दर्शनासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये लहान बालकांचा समावेश मोठया प्रमाणात होता.  उर्स निमित्त पोलीस निरिक्षक भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


 
Top