उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महापुरूषा संदर्भात कांही फालतू बडबड करीत आहेत, अशा लोकांना रस्त्यावर येऊन धडा शिकवणे आवश्यक आहे. तर कांही राजकीय लोक महापुरूषाचे नाव घेऊन स्वत: अजेंडा चालवतात. त्यामुळे समाजाने जागरूक राहुन एकत्र यावे, असे आवाहन इंदौर संस्थानचे होळकर घराण्याचे तेरावे वंशज राजे भुषणसिंह होळकर यांनी केले. 

रविवार दिनाक २१ फेब्रुवारी रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या शिवजयंतीनििमत्त भुषणसिंह होळकर उस्मानाबादेत आले होते. त्यानंतर त्यांनी धनगर समाजाच्या छोटाखानी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. सकाळी शहरात प्रवेश करताना धनगर समाज बांधवांच्या वतीने आहिल्यादेवी होळकर चौकात मध्यवर्ती अहिल्यादेवी होळकर महोत्सव समितीचे  अध्यक्ष लिंबराज डुकरे, माजी जि.प.सदस्य भारत डोलारे, डॉ.संतोष पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, प्रा.बालाजी काकडे, मुकूंद घुले, संतोष वतने, श्रीकांत तेरकर, प्रा. कपिल सोनटक्के, प्रा. मनोज डोलारे आदी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी धनगर समाजाला संबोधीत करताना आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपण   गट-तट विसरून एकत्र आल्यास आपले प्रश्न सुटू शकतात.  कलर वरून भाडण्याचे दिवस नाहीत. पुढे जायचे असेल तर व नव्याने अहिल्यादेवी, यशवंतराव, अब्दुल कलाम असे लोक घडवायचे असतील तर धडाडीने काम करणे महत्वाचे आहे तरच समाजाला योग्य दिशा मिळेल, असेही त्यंानी सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनोज डोलारे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले. तर आभार डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी  संतोष कुलकर्णी, अशोक गाडेकर, अरविंद ढेकणे, नागेश वाघे,    देवकन्या मैंदाड, मिनाषी डोलारे, मानसी डोलारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top