धाराशिव / प्रतिनिधी-

केसरजवळगा, ता. उमरगा येथील- राजकुमार काशीनाथ घोडके, भावजय- राखी घोडके या दोघाचे केसरजवळगा शिवार शेत गट नं 556 मधील 150 फुट केबल, विद्युत पंप असा एकुण  31,120 ₹ किंमतीचे माल हा   अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या राजकुमार घोडके यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो.ठा. मुरुम गु.र.नं 95/2023 भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 सदर गुन्हा तपासादरम्यान मुरुम पोलीस ठाण्याच्या सपोनि- रंगनाथ जगताप  यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ- 390 संजय नायकल, पोलीस अंमलदार- राजेंद्र लोढें, संतोष माळी, खंडेराव होळकर यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आलुर, ता. उमरगा येथील राम प्रभाकर कुंचगे, महादेव सिधाण्णा निजु, केसरजवळगा, ता. उमरगा शिवराज भिमाशंकर घोडके, गिरीश अरविंद पाटील या चौघांनी  केसरजवळगा येथुन ताब्यात घेउन त्यांच्या कडून चोरीचे एकुण 150 फुट केबल व विद्युत पंप जप्त केले. 


 
Top