धाराशिव / प्रतिनिधी-

सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस मुख्यालयात महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. उस्मानाबाद पोलीस दलातील श्रेणी पोलीस उप निरीक्षक  सत्यवान क्षरिसागर, सहाय्यक पोलीस फौजदार- भगवान गाते या 2 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ 

 पोलीस मुख्यालयातील सभागृहात संपन्न झाला. यावेळी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. समारंभादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करताना सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार यांचे डोळे पानावले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सपोनि  बारवकर यांनी केले. तर कार्यक्रंमाचे आभार प्रदर्शन सपोनि  भराटे यांनी केले.


 
Top