धाराशिव / प्रतिनिधी-

 पारधी समाजातील गरीब, गरजु व सुशिक्षीत बेरोजगार मुलांना कौशल्यभिमुख रोजगार मिळवण्यासाठी मा. जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद पांलीसांनी पुढाकार घेतला आहे.या समाजात अनेक युवक सुशिक्षीत असले तरी नोकरी, व्यवसायाच्या माहिती अभावी ते रोजगारापासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेच्या माध्यमातून 3  विद्यार्थ्‌यांची ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ प्रशिक्षणासाठी निवड केली आहे.

  आदिवासी पारधी समाज शिक्षण, शासनाच्या विविध योजनापासून ते वंचित आहे. या समाजातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शासकिय योजनांचा लाभ, त्याचबरोबर शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरी व्यवसायाच्या संधी मिळाव्यात याकरीता मा. जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी नुकतेच तेरखेडा ता. वाशी येथील लक्ष्मी पारधी पिढीमध्ये भरतीय स्टेट बॅक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण्‍ संस्थेमार्फत व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन करण्यात आले होते.तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशन मार्फत 15 विद्यार्थ्याची प्रशिक्षणासाठी निवड केली होती. आता पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेतून अंधेारा, ता. कळंब पारधी समाजातील संतोष आबा काळे, किरण विभीषण काळे, सचिन बालाजी काळे विद्यार्थ्‌यांची ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी तीन  तीन महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्याचा असुन प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी देखील देण्यात आली आहे.त्यांचे प्रशिक्षण मंगळवार पासून सुरु होणार आहे.पारधी समाजातील सुशिक्षीत व रोजगार इच्छुक युवकांनी शासनाच्या योजना, रोजगार व प्रशिक्षणाच्या माहितीसाठी नजीकच्या पोलीस ठाणे किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहान मा. जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी सहा.पोलीस अधिक्षक एम रमेश,येरमाळा पो.स्टे. चे प्रभारी सपोनि- गोरे, प्रशिक्षण प्रभारी आश्विन जगताप आदिनी परिक्रम घेतले आहे.


 
Top