उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंती निमित्त 11 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.13) रोजी प्रा. नितीन बानगुडे-पाटील लिखीत शंभूराजे महानाट्याचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या जवळील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी 6 वाजता शंभूराजे महानाट्याचे उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी जनता बँकेचे माजी अध्यक्ष ब्रीजलाल मोदाणी, कल्याण दळे, डॉ. प्रतापसिंह पाटील, संजय निंबाळकर, अमित शिंदे, जयंत पाटील, भालचंद्र हुच्चे, नितीन बागल, उमेश राजेनिंबाळकर, कुणाल निंबाळकर, प्रकाश खंदारे, चंद्रसेन देशमुख, डॉ. विरेंद्र गवळी, डॉ. धनंजय पडवळ, डॉ. सत्यवान शिंदे, प्रवीण चावरे, गजानन गवळी, धनंजय शिंगाडे, सुनील काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. शंभूराजे महानाट्य हे शनिवारी, रविवारी, सोमवारी हे सलग तीन दिवस नागरिकांना मोफत पहायला मिळाले. तीनही दिवशी कार्यक्रमाला उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील नागरिक, विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक एलईडी व लेजर लाईटींग शोचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, भाजपा ज्येष्ठ नेते अ‍ॅड. मिलींद पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके आदींची उपस्थिती राहणार आहे. 15 फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची उपस्थिती राहणार आहे.


 
Top