तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील  श्री. पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आणि आदर्श मेहता आय अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सोलापूर यांच्या वतीने  सावरगाव येथे रविवार (दि.१२) रोजी मोफत नेत्ररोग निदान शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात २००रुग्णांची डोळे तपासणी करण्यात आली तर काहींना चष्मे वाटप करण्यात आले तर  गरजू रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात येणार असल्याचे डॉ.रेश्मा मेहता यांनी सांगितले, तत्पूर्वी सकाळी १० वाजता शिबिराचे उद्घाटन तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, सोसायटीचे माजी संचालक शरद माने , माजी उपसरपंच भागवत डोलारे, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग हागरे, राजकुमार माने, सचिन माळी, अतुल पवार, दादासाहेब काडगावकर, रोहित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी  पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे डॉ.आदर्श मेहता, डॉ. आनंद मेहता, श्रुती मेहता, वैभव मेहता, ओम कोठाडीया, सुभाष रोकडे यांनी परिश्रम घेतले.


 
Top