उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरातील कुरणेनगर भागात एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाचा आर्थिक देवाण घेवाण मधून डोक्यात दगड घालून खुन केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मित्र व सहकारी असलेल्या या शिक्षकांत वाद झाला त्यानंतर मारहाण होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.

 उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कुल येथे असलेल्या शामराव देशमुख या शिक्षकाच्या डोक्यात आरोपी शिक्षक धीरज हुंबे यांनी दगड घालून खुन केला. आर्थिक देवाण घेवाणवरून हा खुन झाल्याचे समोर आले असुन उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कलम 302 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघेही एकच शाळेत नौकरीस असुन   एकाच भागात राहायला आहेत

 
Top