तुळजापूर / प्रतिनिधी- 

स्वाभीमानी शेतकरी  संघटनेने बुधावारी  चक्काजाम आंदोलना पुर्वी शहरातुन टँक्टर मध्ये गाढव ठेवुन टंँक्टरला कांद्याचा माळा लावुन विनापरवाना शहरातुन रँली काढल्या प्रकरणी पोलिसांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांना ताब्यात घेताच कार्यकत्यांनी रस्ता रोको सुरु केला असता असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन  पोलिस ठाण्यात नेल्यानंतर तेथुन सोडुन देण्यात आले 

  स्वाभीमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी बुधवार दि २२रोजी  बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इषारा दिला होता आंदोलना पुर्वी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारीनी टँक्टर ला कांद्याची माळ लावुन टँक्टर मध्ये गाढव ठेवुन   शहरातुन रँली काढुन ही  रँली भवानी  बसस्थानक चौकात येताच रँली विना परवाना काढल्याच्या कारणावरुन पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र उपाध्यक्ष धनाजी पेंदे यांना   ताब्यात घेताच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकते आक्रमक होवुन तालुकाध्यक्ष दुर्वास भोजणे यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानक चौकात  घोषणा देत रस्ता रोको आंदोलन सुरु केले .यावेळी पोलीस व आंदोलकांन मध्ये झटापट बाचाबाची होवुन वातावरण तंग झाले.अखेर आंदोलकांना ताब्यात घेवुन पोलिस ठाण्यात आणले नंतर वाहतुक सुरुळीत झाली. यावेळी पो. नि अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. 


 
Top