उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, धारासुरमर्दिनी महिला फेडरेशनच्या पूर्व अध्यक्षा कै. सौ. मंजुषा बाळासाहेब कोकीळ यांच्या कुटुंबीयांच्या वतीने कै. सौ. मंजुषा कोकीळ यांच्या स्मरणार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील एका पात्र व गरजू महिला अथवा मुलीसाठी शिक्षणासाठी किंवा प्रशिक्षणासाठी दरवर्षी रुपये २५०००/- निधी देण्याचे ठरले आहे.

यासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन  कोकीळ कुटुंबीय व सौ. मंजुषा  कोकीळ स्मृती सहाय्य निधी समितीच्या वतीने करण्यात येते आहे.  या संदर्भात सौ. उज्वला मसलेकर +918669324780 व सौ. प्रीता गांधी 9270633939 यांच्याशी संपर्क साधावा. 

दिनांक ८ मार्च रोजी धारासूरमर्दिनी महिला फेडरेशनच्या कार्यक्रमात धनादेश प्रदान केला जाईल.

 
Top