उमरगा   / प्रतिनिधी

तालुक्यातील मुळज प्राथमिक आरोग्य केंद्रात संकल्प निरोगी महाराष्ट्राचा या उपक्रमातंर्गत गुरूवारी, (दि ०९) रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला दांडगा प्रतिसाद मिळाला. शिबीरात तब्बल १७९ नागरिकांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले.

 तालुक्यातील मुळज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी एन डी बोडके व तालुका आरोग्य अधिकारी सुहास साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या अध्यक्षस्थानी शंकर बिराजदार होते. यावेळी जेष्ठ नागरिक पांडूरंग बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य अमोल अंबुलगे, वैद्यकीय अधिकारी डाॅ सुशील शिंदे, डाॅ सुमित राऊत, डाॅ शुभांगी घोडके, ग्रामसेवक एस एम बिद्री, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गिरीश कडगंचे, प्रमोद बिराजदार आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ सुशील शिंदे म्हणाले की, महाआरोग्य शिबिरात दिवसभरात प्राथमिक आरोग्य केंद्र व या अंतर्गत येणार्या आरोग्य उपकेंद्र व गावातील महिला, नागरिक व बालकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत, तसेच आरोग्य विषयक सल्ला व उपचाराची आवश्यकता असलेल्या रूग्नावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. जास्तीत रूग्न व नातेवाईकांनी आरोग्य तपासणी करावी तसेच तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने दिलेली औषधी गोळ्या नियमित घ्यावी असे आवाहन शेवटी केले. तत्पूर्वी महाआरोग्य शिबिराचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या महाआरोग्य शिबिरात रक्तगट, रक्तदाब, मधुमेह, उच्च रक्तदाब, बालरोग चिकित्सा, डोळे, हाडाचे विकार, लसीकरन जनजागृती, क्षयरोग- दमा तपासणी, हृदयरोग, पोटाचे विकार, नाक, कान, घसा आदीसह गाव व परिसरातील विविध १७९ रूग्नांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डाॅ सुमीत राऊत यांनी केले, सुत्रसंचालन ध्रुव मायाचारी यांनी केले. अधि परिचारिका सीमा टारपे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वीतेसाठी समुदाय अधिकारी डाॅ सुजाता मोरे, डाॅ छाया जाधव, शिल्पा सपली, प्रकाश गुंठे, आरोग्य सहाय्यक शिरिष मुळे, शंकर बेळंबकर, लिपिक रोहिदास जाधव, रेश्मा झिंगाडे, सोनाली चव्हाण, दौलत जमादार, सुधामती मोरे, नागेश भोगीले, हरी उपासे अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आदिनी परिश्रम घेतले.

 
Top