उस्मानाबाद / प्रतिनिधी|- 

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त   बाबासाहेब आरावत   यांनी शिंगोली आश्रम शाळेस नुकतीच  भेट दिली. शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत शिक्षक व विद्यार्थीशी संवाद साधला. तसेच ई-लनिंग रूमची पहाणी केली.  यावेळी  अद्यावत ई लर्निंग रूम तयार केल्याबद्दल सहशिक्षक सतीश शहाजी कुंभार  यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ देऊन श्री आरावत यांनी सत्कार केला.

 याप्रसंगी संस्थेचे सचिव अण्णासाहेब चव्हाण, मुख्याध्यापक शिंदे कुमंत, माध्यमिक शाळा चे मुख्याध्यापक चित्तरंजन राठोड, पर्यवेक्षक शेख अब्बास अली, श्री जाधव चंद्रकांत,  सूर्यकांत बर्दापुरे, खंडू पडवळ, शानिमे कैलास, राठोड प्रशांत, राठोड विशाल, मल्लिनाथ खोंदे, दीपक खबोले, मदन कुमार अहमदापुरे, सचिन राठोड इत्यादी शिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, वसंत भिसे, अविनाश घोडके, बबन चव्हाण कार्यक्रमास उपस्थित होते.

 
Top