नळदुर्ग  / तानाजी जाधव -

नळदुर्ग शहरातील प्राचीन महादेव मंदीर म्हणून संबोधले जाणारे बोरी नदीकाठचे विठठल मंदीरातील भूयारी महादेव मंदीर होय, हे महादेव मंदीर प्राचीन मंदीर असून या मंदीरातून पून्हा नदीमध्ये असलेल्या शिंवलिंग मंदीराकडे जाण्यासाठी रस्ता आहे परंतु या मंदीरामध्ये सध्या जाता येत नाही, कारण या मंदीरावर सध्या बोरी नदीचे पाण्याचे पात्र आहे, तर दर वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी हे मंदीर एकदा उघडले जाते, मंदीरात जाताना भूयारी मार्ग असून एका वेळेस फक्त जाण्या करता मार्ग असून सुमारे तीस पायऱ्या उतरुन मंदीरात जाता येते, या ठिकाणी शिवलिंग आहे, या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविक गर्दी करतात. एका वेळेस जवळपास दहा ते पंधरा भाविकांना दर्शनासाठी पाठविले जाते व ते भाविक दर्शन करुन आल्यानंतर पुन्हा दुसरे भाविक दर्शनासाठी सोडले जाते, अशी दर्शनासाठी व्यवसथा करण्यात येते. या मंदीराची देखभाल गेल्या तीन ते चार पिढीपासून पुराणिक घराण्याकडे आहे. तेच या मंदीराचे पूजारी असून दरवर्षी महाशिवरात्री निमीत्त या ठिकाणी महाअभिषेक करण्यात येतो. वर्षातून एकदाच भाविकांसाठी दर्शनासाठी हे मंदीर खुले करण्यात येते. अशी परंपरा या मंदीराची आहे.

 तर रामतीर्थ येथील महादेव मंदीर हे अतिशय प्राचीन असून या मंदीराचे बांधकाम कधी झाले आहे सांगता येत नसले तरी हे मंदीर हेमाडपंथी असल्यामुळे अनेक तज्ञ या मंदीराचा इतिहास हा साडे तीनशे ते चारशे वर्षाचा आसल्याचे सांगतात. नक्की मंदीर कोणी बांधले याचा उल्लेख कुठे नाही. मात्र प्रभू श्रीरामाच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या रामतीर्था मध्ये एकूण तीन मंदीर आहेत, एक प्रभू श्रीराम, लक्ष्मण माता जानकी यांचे मंदीर आहे, समोर श्रीरामभक्त हनुमान मंदीर आहे आणि दक्षिण बाजूला महादेव मंदीर आहे, असे सांगितले जाते की, या मंदीरातील शिवलिंग हे प्रभू श्रीरामाने स्थापन केले आसल्याचे बोलले जाते, या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. तर मंदीराचे विश्वस्त विष्णू शर्मा महाराज यांच्या कडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या मंदीरात मंदीरा शेजारी पूर्व बाजूला आसलेल्या कुंडातील एकशे आठ कलशांचा जलाभिषेक ही करण्यात येतो. या मंदीराचा इतिहास फार प्राचीन असून जवळपास सात आठशे वर्षा पूर्वीचा आहे. या मंदीराची थोडी पडझड झाली होती ती आता विष्णू शर्मा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सचिन डुकरे, श्रमीक पोतदार, श्रीकांत पोतदार, धनंजय धरणे, प्रभाकर घोडके, लखन भोसले, रोहीत मोटे, सत्यजीत डुकरे, यांच्यासह पत्रकार विलास येडगे आदीसह बहूसंख्य कार्यकर्ते दुरुस्तीचे काम हाती घेवून मंदीराचा जिर्णोध्दार करण्याच संकल्प केला आहे. या ठिकाणी दर शनिवारी सुमारे दोनशे ते आडीचशे तरुणांकडून हनुमान चालिसा म्हटली जाते तर दर मंगळवारी या ठिकाणी सुदरकांड पठण केले जाते. अशी संध्या मंदीरात परंपरा चालू आहे. 

 
Top