उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

उस्मानाबाद येथे उद्धव ठाकरे गटाला उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा धक्का बसला आहे. भुम परंडा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे संचालक पद अपात्र ठरविण्यात आले आहे. 2 पेक्षा जास्त आपत्य असल्याचे कारणाने पाटील यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद गेले आहे. माजी आमदार पाटील यांचे भुम परंडा मतदार संघात प्राबल्य असुन ते एकेकाळी मंत्री सावंत यांचे निकटवर्तीय होते. 

 राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत याचे पुतणे तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या तक्रारीनंतर सुनावणी अंती ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.लातूर विभागीय सहनिबंधक डॉ ज्योती मेटे यांनी लेखी आदेश दिले आहेत. पाटील यांना पुढील 5 वर्ष जिल्हा बँकेची निवडणूक लढता येणार नाही असे त्यात नमूद केले आहे.

  21 फेब्रुवारी 2022 रोजी संचालक पदी निवडणुकीत त्यांनी 2 पेक्षा जास्त असलेली इतर अपत्य नमूद केली नाहीत अशी तक्रार धनंजय सावंत यांनी केली. पाटील यांचा पहिला विवाह सौ सिंधू यांच्यासोबत झाला परंतु त्याचे आकस्मात निधन झाले. सौ सिंधू यांच्यापासून पाटील यांना पहिले अपत्य 7 मार्च 1993 रोजी झाले तर दुसरे आपत्य 12 ऑगस्ट 1995 रोजी झाले त्यानंतर पाटील यांनी सौ राणी उर्फ उषा यांच्याशी विवाह केला त्यापासून त्यांना 2 आपत्य झाली. त्यातील पहिले अपत्य 15 सप्टेंबर 2006 व दुसरे 15 ऑक्टोबर 2008 रोजी झाले. या चारही अपत्य यांच्या नोंदी नगर परिषद बार्शी येथे करण्यात आलेल्या आहेत.ज्ञानेश्वर पाटील हे यापूर्वी 2009 मध्ये जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांना 2001 नंतरचे 2 अपत्य असल्याने संचालक पद रद्द करावे अशी मागणी धनंजय सावंत यांनी केली होती,त्यावर सुनावणी झाली.

 पाटील यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी अपत्य माहिती दडवली, त्यावेळी छानणी वेळी भालचंद्र नेटके, भोंजा परंडा यांनी याच अपत्य मुद्यावर आक्षेप घेतला मात्र पुरावे दिले नाहीत व नंतर आक्षेप स्वखुशीने मागे घेतला.


 
Top