उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिगोली आश्रम शाळेत संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे कुमंत व प्रमुख पाहुणे चित्तरंजन राठोड यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

श्री संत गाडगे बाबा यांच्या विषयी पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.  ग्रामस्वच्छता,  अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक न्याय  ही सर्व माहिती संत गाडगेबाबा यांनी  कीर्तनातून जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी सुद्धा संत गाडगेबाबांचा आदर्श ठेवून शिक्षण घेऊन समाजासाठी, राष्ट्रासाठी कार्य केले पाहिजे असे आव्हान शेख अब्बास अली यांनी केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक खबोले यांनी केले. कार्यक्रमासाठी सूर्यकांत बर्दापुरे, पडवळ खंडू, प्रशांत राठोड, विशाल राठोड, सुधीर कांबळे, कैलास शानिमे, मल्लिनाथ खोंदे, सचिन राठोड, सतीश कुंभार, इत्यादी सहशिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, वसंत भिसे, बबन चव्हाण, रेवा चव्हाण, सचिन माळी, अविनाश घोडके, अमोल जगताप इत्यादी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार पाटील रत्नाकर   यांनी मानले.

 
Top