उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती देशभरातील विविध तांडा, वस्तीवर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच अनुषंगाने शिंगोली तांडा ता. उस्मानाबाद  तसेच जळकोटवाडी तांडा, ता.तुळजापूर येथील जयंती उत्सवात  अर्चना पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेतील महिलांचे नृत्य पाहून उत्साहित होत सौ.अर्चनाताई यांनाही आभूषणे परिधान करून नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही.  

 याप्रसंगी  अर्चना पाटील यांनी बंजारा समाज बांधवांची तांडा विकास आढावा बैठक घेऊन समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या. तांडा वस्तीवर चांगले रस्ते व्हावेत अशी प्रामुख्याने सर्वांकडून मागणी करण्यात आली. इतरही समस्या महिलांनी मांडल्या. सर्व मागण्या आस्तेवाईकपणे ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

  यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस श्री.विलास राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य  गणेश सोनटक्के, माजी पंचायत समिती सभापती  .रेणुका इंगोले,  रंजनाताई राठोड,  वसंत पवार,  भिवाजी इंगोले,  आनंदा पवार, विनायक राठोड,  प्रकाश राठोड, गोपीनाथ राठोड,  शंकर राठोड, मनोज चव्हाण,  श्रीमंत राठोड, भीमाशंकर राठोड, लता  पवार, आशाताई पवार व परिसरातील रामतीर्थ, अलीयाबाद, बोरमन तांडा, मानमोडी तांडा, वसंतनगर तांडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.  तसेच शिंगोली तांडा ता. उस्मानाबाद येथेही संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी सरपंच  योगिता राहुल शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, गोर सेना महाराष्ट्र संघटक राजाभाऊ पवार, प्रेमदास पवार, नायक राजुदास आडे, दिलीप आडे, बालाजी राठोड ,सचिन पवार, अनिल चव्हाण, दीपक घुटे, संतोष राठोड, विशाल जाधव, उत्तम चव्हाण तसेच शिंगोली गावातील नागरिक उपस्थित होते.


 
Top