कळंब / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ व संयुक्त कृती समिती ने पुकारलेल्या आंदोलनात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब या युनिट अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या आडमुठ्या आणि उदासीन धोरणाचा निषेधार्थ दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करणे, 10,20,30 लाभाची योजना महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, 1 जानेवारी 2016 ते 31 ऑक्टोबर 2020 अखेर प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्यादरम्यानची फरकाची थकबाकी मिळणे बाबत, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणेबाबत, 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे या प्रमुख न्याय मागण्याबाबत एक दिवसाचा संप पुकारण्यात आलेला आहे. 

या संपास पाठिंबा देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे अधिसभा सदस्य मा डॉ.नरेंद्रजी काळे व डॉ.संजय कांबळे यांनीही संपास सहभाग घेऊन महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मागण्यांची माहिती घेऊन चर्चा केली संपात सहभागी कर्मचारी श्री.प्रकाश गायकवाड,श्री विनोद खरात श्री नेताजी देशमुख,अरविंद शिंदे इकबाल शेख,हनुमंत जाधव,संतोष मोरे,बालासाहेब चौधरी,भरत शेळके,उत्तम जाधव,अनिल पवार, यशवंत पाटील,मारुती केचे,दत्तात्रय गावडे,चांगदेव खंदारे,विश्वनाथ वाघमारे, रमेश पवार ,बालाजी डीकले,राजाराम जमले,अमोल सुरवसे,अंकुश लोकरे,श्रीमती संगीता रुमणे श्रीमती मनीषा लिमकर ,श्रीमती जयश्री पांचाळ,श्रीमती मीनाक्षी पाडोळे,श्रीमती राजश्री भारती,श्रीमती सुनंदा झांबरे,श्रीमती सुरेखा अंबिरकर,श्रीमती कल्पना मडके,उमेश साळुंखे, कालिदास सावंत,रमेश भालेकर,अर्जुन वाघमारे,जीवन वाघमारे,आदी कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहेत.


 
Top