तुळजापूर / प्रतिनिधी- 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद  सावंत यांनी बुधवार दि. २२रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेची पुजाअर्चा करुन मनोभावे दर्शन घेतले.

 गोव्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होताच देवीदर्शनार्थ येवुन देविजींचा कुलधर्म कुलाचार करण्याची त्यांची इच्छा होती ती आज देविजींचा कुलकुलाचार करुन पुर्ण केली. श्री तुळजाभवानी दर्शनानंतर मंदीर संस्थानच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त  योगेश खैरमाटे यांनी मुख्यमंत्री योगेश सावंत यांचा  कवड्याची माळ घालुन   देविची प्रतिमा देवुन महावस्ञ देवुन सत्कार केला. यावेळी तहसिलदार सौदागर तांदळे, प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे , जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे , विशाल रोचकरी, भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे, पो.नि अदिनाथ काशीद उपस्थितीत होते. 

 
Top