उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा झालेले वेतन व अनुदानाचे ऑडीटर कढुन लेखा परिक्षण करून घेण्यासाठी मुख्याध्यापिकेला जि.प.केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक भारत रामभाऊ भालेकर  ( तेरखेडा तालुका वाशी जि. उस्मानाबाद)  यांनी ३०० रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार मुख्याध्यापिका यांनी केलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी विकास राठोड यांच्या टिमने ही कामगिरी केली. या टीम मध्ये इप्तेकार शेख, मधुकर जाधव, सचिन शेवाळे यांचा समावेश होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलिस अधिक्षक विशाल खांबे, उपधिक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्रवाई करण्यात आली आहे. 

 
Top