उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित के.टी पाटील संगणक शास्त्र महाविद्यालय व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी दुपारी 04 वाजता SEBI(Securities and Exchange Board of India यांच्या अंतर्गत"Wealth Awareness Program "या विषयावर वेबिनार संपन्न झाला. आपले वित्त उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शक्तिशाली तत्त्वे जाणून घेण्यासाठी तसेच आर्थिक नियोजन, कर नियोजन, आणि शांततापूर्ण सेवानिवृत्तीसाठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी व संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना श्रीमती मनीषा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संपत्तीचे नियोजन कसे करावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की"आपल्या आर्थिक साधनांचे योग्य व्यवस्थापन करून आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याची प्रक्रिया म्हणजेच आर्थिक नियोजन होय. परंतु आपल्यापैकी बरेच जण तशी अवघड नसणारी गोष्ट करत नाहीत. फक्त श्रीमंतांनीच आर्थिक नियोजन करायचे असते "आपल्याकडे अजून पैसे आले की त्याचा विचार करू किंवा ते खूप किचकट आहे मला ते जमणार नाही अशी कारणे सांगतात ". पण असे गैरसमज तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. आर्थिक नियोजनात गुंतवणूक, आयुर्विमा, सर्वसाधारण विमा, मेडिक्लेम, प्राप्तिकर नियोजन, इच्छापत्र इत्यादी बाबींचा समावेश होतो. आर्थिक नियोजन करताना आपल्यालाच प्रश्न विचारून त्याची पूर्ण विचारांती उत्तरे द्या म्हणजे तुमचे स्वप्ने आणि आकांक्षा यांचे प्रतिबिंब तुमच्या अर्थ नियोजनात दिसेल. असे विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरेही दिली.

या वेबिनारसाठी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अजित मसलेकर, प्रा पराग कुलकर्णी, डॉ. कृष्णा तेरकर, , प्रा शुभम पाटील, प्रा सायली गवळी, प्रा राघवेंद्र मुंडे, श्री विनोद बनसोडे, श्री अजय शिराळ, तसेच के टी पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय व वाणिज्य महाविद्यालयातील 100 हून अधिक विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते. वेबिनार संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

वेबिनार यशस्वी संपन्न झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा श्री सुधीर (अण्णा) पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील यांनी अभिनंदन केले.

 
Top