तुळजापूर  / प्रतिनिधी-

 मागील २५ पंचवीस वर्षापासून सावरगाव ते दहिवडी सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे नूतनीकरणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने दहिवडी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तीन हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या दहिवडी गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय केंद्र जिल्हा मध्यवर्ती बँक मेडिकल यासह  दैनंदिन व्यवहारासाठी सावरगावला यावे लागते अशावेळी मोठी तारेची कसरत करून प्रवास करावा लागतो मोटरसायकल दगडगोठ्यावरून घसरून पडून अपघात झाल्याचे देखील घटना घडत आहेत यामुळे दहिवडी ग्रामस्थांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला सावरगाव ते दहिवडी रस्ता नूतनीकरण करून दहिवडीकरांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान न करता सकल ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असल्याचे ग्रामस्थांनी दिला.

 सावरगाव ला प्राथमिक आरोग्यकेंद्र आहे दहीवडी येथील आजारी ग्रामस्थ सावरगाव ला न्यायचे म्हटल खाजगी वाहनाने सहा किलोमीटर अंतराला ऐक तास जातो ऐवडी रस्ताची दुरावस्था झाली.


 
Top