कळंब / प्रतिनिधी- 

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७/०२/२०२३ शुक्रवार रोजी कला व विज्ञान शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात'पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभा'चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवर व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विद्यापीठ ध्वज घेऊन  महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून स्वागतफेरी  काढण्यात आली. स्वागत फेरीतील मान्यवरांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मा.श्री.शिवाजी (आप्पा ) कापसे(सचिव शि.प चॅरिटेबल ट्रस्ट कळंब) व प्रमुख अतिथी  प्रा.डॉ.अंकुश कदम( अधिसभा सदस्य , डॉ.बा.आं.म.वि.औ.बाद) तसेच प्रमुख उपस्थितीत मा.श्री.श्याम खबाले(अध्यक्ष शि.प. चॅरिटेबल ट्रस्ट कळंब)  मा.प्रा.अविनाश मोरे ( उपाध्यक्ष शि.प. चॅरिटेबल ट्रस्ट कळंब)  मा.प्रा.संजय घुले ( सहसचिव शि.प. चॅरिटेबल ट्रस्ट कळंब) श्री.बाळकृष्ण गुरसाळे( कोषाध्यक्ष शि.प.चॅरिटेबल ट्रस्ट कळंब ) श्री.भागवत चोंदे ( सदस्य शि.प.चॅरिटेबल ट्रस्ट कळंब ) व  श्री.कवडे महाराज हे होते.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.अंकुश कदम यांनी यावेळी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्या विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केलेलीआहेत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात उज्वल यश संपादन करण्यासाठी विविध करिअरच्या संधी कोठे आणि कसे उपलब्ध होतील या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा.अनिल जगताप यानी केले. 

कार्यक्रमाध्यक्ष  प्राचार्य.शाशिकांत जाधवर यानी अध्यक्षीय समारोप व सूत्रसंचालन प्रो.डॉ.हनुमंत माने यांनी केले तर आभार प्रा.शफीक चौधरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे डॉ.हनुमंत माने,प्रा.शफीक चौधरी, प्रा.डॉ.उद्धव गंभिरे,  आयक्युएसी समन्वयक प्रा.अनिल जगताप, डॉ.विद्युलता पवार मॅडम, तसेच प्रा.अभिमान ढाणे  प्रा.डॉ.महावीर गायकवाड प्रा.डॉ.हंडीबाग  प्रा.डॉ.प्रदिप चौधरी तसेच तांत्रिक सहाय्यक साठी श्री.दत्तात्रय कांबळे व व्यवस्थापन साठी  श्री.दत्ता गायकवाड  श्री.सुंदर कदम , श्री.काका चोंदे ,श्री.अशोक भोसले ,श्री घोगरे तात्या तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top