कळंब / प्रतिनिधी- 

 वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन परभणी येथे दिनांक १२, १३,१४ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते या  संमेलनात भव्य स्वरूपात वारकरी वेशात  पुरुष व महिला असा एकून 180 दिंड्यानी  सहभाग  घेतला होता.सर्व  सहभागी दिंडी संघातून धाराशिव जिल्हा महिला दिंडी संघास विभागून रुपये 15,०००चे  प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. या महिला संघासाठी वारकरी साहित्य परिषद महिला  धाराशिव जिल्हा अध्यक्षा ह.भ.प .सुनीतादेवी आडसूळ व तुळजापूर तालुका अध्यक्षा वसुधाताई कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सहभाग होता या संघात कुंताताई तवले, सुलोचना शिनगारे ,अनुराधा ढगे ,सुवर्णा देडे, मंगल वेद पाठक ,आर्या सराफ, हरू बाई माळी ,गणेश माळी ,सूर्याजी चिवरे,(मृदंग) शिला जमदाडे ,केराबाई माळी ,कौशल्या साळुंखे, बायडाबाई रोकडे, रामाताई नकाते ,रतन गोरे, प्रभावती बारगजे ,उषा तोडकर ,चित्रा पवार, सुनंदा माने, रमेश सगरे ,सूर्यभान सोनवणे , कालींदा ,गोंड गिरी ,सुमन देशमुख ,नंदूबाई देढे, केशर देशमुख यांचा समावेश होता वारकरी साहित्य परिषद राज्य महिला प्रमुख मलुश्री विठ्ठल पाटील ,(सांगलीकर )यांच्या शुभहस्ते  विजयी संघास बक्षीस वितरण करण्यात आले. या यशाबद्दल मीराताई चोंदे, शारदाताई पिंगळे, धनश्री कवडे ,छायाताई कुंभार प्रा.मीनाक्षी भवर ,रंजनाताई पिंगळे, सुनंदाताई कापसे स्नेहाताई टोणगे,अॅड शकुंतला फाटक, अमृता देशमुख, रुकसाना बागवान, सलमा सौदागर, ज्योती सपाटे , सिंधुताई बडोरे,  मीनाक्षी घोडके, योजना वाघमारे, दुर्गा शिंदे ,विजया पांचाळ या सर्वानी अभिनंदन केले.


 
Top