उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

चिखली, ता.धाराशिव येथील श्री संत बाळूमामा यांच्या मंदिरासमोरील सभामंडपाचे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 आमदार  राणाजगजितसिंह पाटील  यांच्या आमदार निधी मधून सदरील कामासाठी ७ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाची भावना यावेळी दिसून आली.

 याप्रसंगी  संत बाळूमामा मंदिराचे पुजारी  नितीन महाराज,  गजेंद्र महाराज,  दुष्यंत चोबे,  राजाभाऊ जाधव,  िद्धेश्वर गवळी,  तेजस सुरवसे,  कुंद पाटील,  बाजीराव जाधव, श्री.रामकृष्ण अघोर, श्री.मोतीराम बोंदर,  बाबा कदम, रवी सुरवसे, श्री.अण्णा चव्हाण, चेतन सुरवसे,  पांडुरंग पाटील,  संजय मुखडे,  विश्वनाथ भोजने,  सिद्धेश्वर पाटील,  विकास गोडसे,  राजाभाऊ आवटे,  निवृत्ती मते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top