लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील मार्डी  येथील हिंदु स्मशाभूमीला जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे अंत्यविधीला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. रात्री-अपरात्री तसेच पावसाळ्यात चिखलामुळे अंत्यविधीला जाता येत नसल्याचे ओळखुन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या प्रयत्नांतून 25/15 योजनेअंतर्गत 20 लक्ष रूपये दोन टप्प्यात या रस्त्याच्या कामासाठी मंजुर करून घेतले. दि.26 फेब्रुवारी 2023 रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते त्यातील पुर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण व पुढील करण्यात येणाऱ्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले. तसेच आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी जी ग्रामपंचायत बिनविरोध निघेल त्या ग्रामपंचायतीस 25 लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले होते

. बोलल्याप्रमाणे त्यांनी ग्रामपंचायतीस निधी उपलब्ध करुन देवुन त्यांचा शब्द पाळला. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, नगरपंचायत अर्थ व बांधकाम समिती सभापती अमिन सुंबेकर, नगरसेवक अविनाश माळी, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, ओम कोरे, ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, माजी सरपंच दत्ता पाटील, माजी सरपंच अण्णासाहेब पाटील, माजी सरपंच आप्पासाहेब पाटील, माजी चेअरमन बाबुराव कदम कदम, देवराव कोकरे, पं.स. माजी सदस्य इंद्रजित लोमटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top