तुळजापूर /प्रतिनिधी

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी  सुनेञाताई अजित पवार व  भाजपा आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी माजी  जि.प  उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी शनिवार दि.२५रोजी सांयकाळी सात वाजता धाराशीव येथुन एकञित  तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्री तुळजाभवानी मातेची यथासांग पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले.  यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी शिवाजी पवार यांनी केले.

 तिर्थक्षेञ तुळजापूरात  राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ  शिंदे यांनी त्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी  काँग्रेसचे तालुका संघटक बबन गावडे,  ज्येष्ठ  खंडोजी जाधव,  युवा  अमोल शिंदे,  शांतीलाल घुगे, अर्जुन  साळुंखे  नितीन  रोचकरी , अविनाश गंणने , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top