धाराशिव / प्रतिनिधी-

  डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल मिशन 2023 हे मिशन अब्दूल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन स्पेसझोन इंडीया व मार्टिन ग्रुप यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. देशाभरातील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या 5000 विद्यार्थ्यांना विज्ञान तत्रंज्ञान आणि गणित वर काम करण्यासाठी प्रेरीत करणे आणि 150 PICO च्या डिझाईन आणि विकासाठी त्यांना त्यांचे ज्ञान आणि कौशल्या वापरण्यास सक्षम करणे हे अभ्यिानाचे मुख्य उद्दीष्टे होते.

 पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनखाली धाराशिव पोलीस दलातील पोलीसांच्या 06 पाल्यानी या अभियानामध्ये सहभाग नोंदविला. तेलंगणाचे मा. राज्यपाल आणि पुदुचेरीचे मा. लेफ्टनंट गव्हर्नर डॉ. एपीजेएम नजिमा मरईकायर डॉ. APJMJ शेख सलीम डॉ. आनंद मेगलिंगम डॉ. लीमा रोज मार्टीन यांच्या उपस्थ्तिी मध्ये कार्यक्रम वार पडला.

  महाराष्ट्रातुन एकुण 530 विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदविला तामिळनाडु येथील पट्टीपुलम येथुन यशस्वी रित्या भारतातील पहिले हायब्रीड रॉकेट लाँच झाले. त्यासोबत विद्यार्थ्यांनी बनविलेले 150 उपग्रह आकाशात यश्स्वीपणे नेण्यात आले. उपग्रह आकाशात नेण्यासाठी वापरलेले रॉकेट हे संपुर्णपणे भारतीय बनावटीचे असुन या रॉकेटमध्ये ऑक्सीडायजर आणि फ्युईल टशा दोन प्रकारचे इंधनाचा वापर केला गेला होता. तसेच या मियानचे अजुन एक वैशिष्ट्य असे की, संपुर्णपणे भारतीय विद्यार्थ्यांची ही मिशन होता. पुर्ण जगात अशी स्टुडंटस मिशन  आजवर झालेली नसल्याने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी झाली.हायब्रेड रॉकेट 150 PICO उपग्रहासोबत अवकाशात झेपावले आणि लगेच सर्व उपग्रह आपापले कार्य करुन जमिनीवर उभारलेल्या केंद्राशी संपर्क करुन वातावरणातील विविध माहिती पाठवू लागले. अतिशय रोमांचित असलेल्या या मोहिमेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन विद्यार्थ्यी पालक व शिक्षक यांनी पट्टीपुलम येथे हजेरी लावली होती. या विद्यार्थ्यांना आधी 10 दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण श्री मोहिते चौधरी यांचे मार्गदर्शनखाली देण्यात आले होते. त्यानंतर पुणे येथे एक दिवस एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम फाउंडेशन व्दारा आयोजित  करण्यात आले होते.

 सदर अभियानात धाराशिव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार यांच्या राज विशाल राजेश्वरकर, सार्थक अमोल गणेश, पियुष गोकुळ पवार, कृष्णा किरण मुंढे,प्रथम महेश वैकुंठे, रजनीश महेश वैकुंठे विद्यार्थ्यीनी सहभाग नोंदविला.


 
Top