तुळजापूर / प्रतिनिधी-

देविजीची सिंहासन पुजा बुकींग संबंधी येणा-या अडचणी दूर करणे व   सिंहासन बुकींग यंत्रणा अदयावत करण्यासाठी  जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी, उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती तयार करण्यात आलेली असून त्यानुसार सर्व यंत्रणा अदयावत करण्यात येणार आहेत. जेणेकरून सिंहासन बुकींग संबंधी येणा-य अडचणी दूर होऊन अदयावत यंत्रणा कार्यान्वित होईल. अशी माहीती मंदीर प्रशासनाने दिली.

श्री तुळजाभवानीच्या  सिंहासन  बुकींग  बाबतीत तांत्रिक ञुटी मुळे तीन वेळा सिंहासन बुकींग पुढे ढकलण्यात आली होती. अखेर बुकिंग यंञणा सोमवार दि. ३०रोजी पुर्ण झाली. यात बहुतांशी भाविकांचे सिंहासन बुकींग झाले नाही ,अभिषेक पासेस मध्ये ही ञुटी होत्या या बाबतीत श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने सिंहासन अभिषेक पासेस बुकिंग यंञणा अद्यावत करण्याची मागणी मंदीर संस्थान कडे केली होती.

 श्री तुळजाभवानी मातेच्या सकाळ व संध्याकाळ या वेळेस करण्यात येणाऱ्या अभिषेक पासवरील वेळा (सकाळ / संध्याकाळ ) यामध्ये सकाळ एवजी संध्याकाळ तसेच संध्याकाळ ऐवजी सकाळ असा बदल करून किंवा दिनांकामध्ये बदल करून बनावट पास दर्शविण्यात येत असल्याचे वारंवार निदर्शनास आल्याने अभिषेक पास संबंधीच्या दैनंदिन अहवालानुसारच पासची खात्री करून भाविकांना अभिषेक पुजेकरिता प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत संबंधीत सुरक्षा रक्षकांना आदेशित करण्यात आले आहे. यामुळे बनावट पास दर्शविण्याच्या प्रवृत्तीला आळा बसलेला आहे.


 
Top