तुळजापूर / प्रतिनिधी-

 पुर्वी पैलवांन व तालमींचा  तालुका म्हणून आपली ओळख होते ,असे स्पष्ट करुन आज गावोगाव हातभट्टी  दारुचा सुळसुळाट असुन हातभट्टी पिवुन पैलवान निर्माण होणार  का असा सवाल करुन पैलवान निर्मितीसाठी गावात एक थंेबभर दारु विकली जाणार नाही, अशी प्रतिज्ञा करा असे आवाहन करुन जिथे कमी तिथे मी असेन अशी ग्वाही माजी मंञी माजी आ.मधुकर चव्हान यांनी आरळीब्रु  येथे आखाडा उद्घाटन सोहळ्यात दिली.

 आरळी बु. येथील माऊली बहूउद्देशीय सामाजीक संस्थेच्या नियोजित शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भव्य कुस्ती आखाडा,खुली जीम, खो खो,कबड्डी,हॉलीबॉल आदी मैदानाचे भूमीपूजन व वृक्षारोपण माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे,उप महाराष्ट्र केसरी पै.मारुती वडार,मारुती खोबरे गुरुजी,सरपंच गोविंद पारवे, पञकार संघाचे जिल्हाउपाअध्यक्ष श्रीकांत कदम सतिष महामुनी वामनराव  गाते,संजयपारवे  महेश गवळी रामचंद्र गिड्डेसह पैलवान यांच्यासह खेळाडु,  ग्रामस्थ उपस्थितीत होते. 

 
Top