उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि.31) उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील राजकीय, सांस्कृतिक विषयांवर चर्चा करुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.

 आ.जयंत पाटील हे एका कार्यक्रमासाठी उस्मानाबाद येथे आले होते. त्यानंतर आ.पाटील यांनी शिंगाडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी धनंजय शिंगाडे व विशाल शिंगाडे कुटुंबीयांच्या वतीने आ.पाटील यांचे औक्षण करुन भव्य पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी केलेले कार्य तसेच सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून उभारलेले नाट्यचळवळ तसेच लोककलावंतांच्या प्रश्नावर केलेल्या कार्याची माहिती आ.पाटील यांच्यासमोर मांडली. आ.पाटील यांनी पक्षस्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी शिंगाडे यांना दिली.


 
Top