उस्मानाबाद/प्रतिनिधी

 जिल्ह्यात दि.19 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. जयंती उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक शांतता अबाधीत राखण्यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142(1) अन्वये जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी, एफएल-2, सीएल-3, एफएलबीआर-2, परवानाकक्ष अनुज्ञप्त्या, एफएल-4 अनुज्ञप्त्या, ताडी विक्री अनुज्ञप्त्या दि.19 फेब्रुवारी रोजी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

             या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 
Top