उस्मानाबाद -/ प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रमावेळी सांड उधळल्याने 14 भाविक जखमी झाले असुन त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री 3 च्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते, अचानक सांड उधळल्याने मोठी धावपळ उडत चेंगराचेंगरी झाली.

 सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमीमध्ये 2 भाविक परंडा, 1 कर्नाटक व 11 हे उस्मानाबाद शहरातील असुन यात 7 महिला व 7 पुरुषांचा समावेश आहे.  पोलिस व वैद्यकीय पथक तात्काळ हजर झाल्याने गर्दीवर नियंत्रण व जखमीवर उपचार शक्य झाले. उस्मानाबाद पोलिस व आरोग्य विभागाने तात्काळ प्रतिसाद देत स्तिथीवर नियंत्रण मिळविले.

 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे, डॉ श्रीराम देवकते, सर्जन डॉ पारितोष कुरुंद, डॉ प्रीतम राऊत यांच्या वैद्यकीय टीमने मोठी मेहनत घेऊन जखमीवर उपचार केले तर शहर पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांचे पथकाने गोंधळ उडालेल्या जमावाला शांत करीत स्तिथी नियंत्रनात आणली. मसुद शेख, खलिफा कुरेशी, बबलू शेख, समियोद्दीन मशायक,अझहर शेख, बाबा मुजावर, जमीर शेख,अन्वर शेख, गयास मुल्ला, वाजीद पठाण, इस्माईल शेख यासह सामाजिक कार्यकर्ते यांनी जखमी नागरिकांना रुग्णालयात आणत योग्य ती मदत केली.

 जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ सुलभा कौरव, मोहिते, अंकुश, पवार, जुबेर, रेडिओलोजी विभागाचे काथवटे व धोत्रे यांनी वैद्यकीय सेवा केली.

 
Top