परंडा / प्रतिनिधी-

येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांची महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे करिअर कट्टा उस्मानाबाद जिल्हा समन्वयक म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यावा यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-  24 या वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी नुकतेच दिले आहे.

        प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेले विविध उपक्रम तसेच करियर कट्टा परंडा तालुका उत्कृष्ट समन्वयक म्हणून मिळालेला पुरस्कार पाहता या बाबीचा विचार करून त्यांची निवड करण्यात आली आहे .त्यांच्या या निवडीमुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद चे माजी संचालक प्राचार्य डॉ अशोक मोहेकर या महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी अभिनंदन व कौतुक केले.

 
Top