वाशी/ प्रतिनिधी-

येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे दि.१२/०१/२०२३ रोजी विज्ञान कनिष्ठ विभागातील  राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी  कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय,वाशी व जिल्हा जात पडताळणी समिती, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयात शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावर्षी दोन वेळा याच विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी लागणारी कागदपत्रे व याचे फायदे याचे मार्गदर्शन केले होते.त्यामुळे  कांही विद्यार्थ्यांनी उस्मानाबाद येथे प्रस्ताव दाखालही केलेले आहेत.परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रस्ताव दाखल केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी दि. १२/०१/२०२४ रोजी शिबीर आयोजित केले होते.या शिबिरासाठी एकूण ११ विद्यार्थी जात पडताळणी प्रस्ताव घेवून आले होते.त्यापैकी ०१ विद्यार्थ्यास त्रुटीची पूर्तता करण्यास सांगितले १० विद्यार्थ्यांची कांहीही त्रुटी नसल्याने त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.दिवसभर महाविद्यालयात थांबून लगेचच त्याच दिवशी १० विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. हे वैधता प्रमाणपत्र बलभीम शिंदे साहेब, उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती,उस्मानाबाद व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.रविंद्र कठारे यांचे हस्ते देण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त शिंदे साहेब यांनी सांगितले की उर्वरीत विद्यार्थ्यांनी प्रस्ताव दिल्यास महाविद्यालयात प्रमाणपत्र आणून देण्यात येईल.ज्या विद्यार्थ्यांनी प्रस्ताव उस्मानाबाद येथे दाखल केलेले आहेत त्यांचीही छाननी झाल्याचे सांगीतले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. रविंद्र कठारे होते. 

याप्रसंगी सूर्यकांत कठारे साहेब,जात पडताळणी सहाय्यक अधिकारी उस्मानाबाद  व त्यांचे सहाय्यक हे उपस्थित होते.  प्रमाणपत्र मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रतिक्रिया देताना या उपक्रमाचे कौतुक केले.वेळ व त्रास वाचला असे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अजित तिकटे,समन्वयक विज्ञान विभाग यांनी केले व प्रास्तविक ओम क्षीरसागर,समन्वयक इक्वल आॕपाॕर्चुनिटी सेंटर यांनी केले. याप्रसंगी  कनिष्ठ विज्ञान विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


 
Top