वाशी:प्रतिनिधी

 जिल्हा परिषद कन्या प्रशाला,वाशी दिनांक ११/ १ /२२ ते १२/ १/२२ दरम्यान तालुका  स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये सांघिक खेळामधील कबड्डी खेळामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या सुदर्शन अशोक तेली  या  विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली संघाने तालुक्यामधून द्वितीय क्रमांक पटकावला तर बुद्धिबळ खेळामध्ये १४ वर्षा खालील मुलांच्या गटमध्ये जय धनंजय राऊत या विद्यार्थ्यांने  तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकावला.तसेच १४ वर्षा खालील मुलींच्या गटामधुन तनिष्का बालाजी माने  हिने  तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला . तसेच उंच उडी क्रीडास्पर्धेत १४ वर्षा खालील मुलांमधून वेदांत दिनेश वासकर याने तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची  जिल्हस्तरीय  परीक्षेकरता निवड झाली आहे .शाळेच्या वतीने सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी.आर,शिक्षक राऊत डी.बी.,तेली ए.बी.शिक्षिका जगताप.एस.पी.,गोसवी .एस.के इत्यादी उपस्थित होते.


 
Top