तुळजापूर/ प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात शुक्रवार राञी अर्धा तास अचानक विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील अर्धा भाग शुक्रवार राञी अंधारात बुडुन गेले होता.
शुक्रवार राञी ७.४५वा. अचानक मंदीर परिसरासह शहरातील विद्युत पुरवठा अचानक बंद झाला. यात भवानी रोड मंदीर परिसर, महाध्दार रोड याभागातील विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाल्याने भाविकांनसह शहरवासियांना गैरसोयीस सामोरे जावे लागले. माञ महावितरणच्या अधिकारी - कर्मचारी वर्गाने शर्थीचे प्रयत्न करुन नवीन सबस्टेशन मधील तांत्रिक अडचण दुर केल्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा पुर्ववत झाल्याने भाविकांनसह नागरिकांना दिलासा मिळला आहे.