उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यामार्फत महिला सभासदांसाठी मकरसंक्रातनिमित्त हळदी-कुंकू व गळीत हंगाम २०२२-२३ मधील ७,५१,१५१ व्या साखर कट्टयाचे पुजन  वैशाली ताई मोटे, राज्य समन्वयीका, यशस्वीनी अभियान, महाराष्ट्र राज्य,  डॉ. तबस्सुम सुलताना सय्यद, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार,  कमल ताई कुंभार, राष्ट्रपती नारी शक्ती पुरस्कार, मा.डॉ. स्मिता शहापुरकर,  अध्यक्षा, लोकप्रतिष्ठाण, उस्मानाबाद,  सुरेखा जाधव, शेती तज्ञ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 

सदर प्रसंगी बोलतांना  डॉ. सय्यद यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिला सभासदांना शिक्षणाचे महत्व सांगुन स्वतःच अस्तित्व निर्माण करणे व कठीण प्रसंगातही स्वतःला कमी न समजता महिलांनी आत्मनिर्भर होणेची गरज असलेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी   कमल ताई कुंभार यांनी बचत गटाचे महत्व व त्या माध्यमातून कुक्कुटपालन, शेळी पालन इ. व्यवसाय कसे उभा करायचे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच  डॉ. स्मिता शहापुरकर यांनी आरोग्यविषयक व सक्षम स्त्री बनण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मा.सी. सुरेखा जाधव यांनी सेंद्रीय शेतीविषयी व उत्पन्नाचा स्त्रोत कसा वाढवायचा याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे प्रत्येक महिलांनी स्वतःला कमजोर न समजता आत्मविश्वासाने काम करून स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन केले.   वैशाली ताई मोटे यांनी आंबेडकर कारखान्यात महिला सभासदांसाठी मकर संक्रातीनिमित्त आयोजीत केलेला हळदी-कुंकूवाचा मेळावा हा स्त्युत्य उपक्रम आहे असे सांगितले. तसेच त्यांनी “धुना भाकरीचे हात पटकण चिमुकली शाळेला निघाली आहे, चिमुकली आता चिमुकली नाही राहीली, ती आता चंद्रावर चाललेली आहे, मनामध्ये फुलली शाळा ओठामध्ये गाणं आहे, जिवार वंदन तुला साविजी आई तुझ्या कर्तुत्वाचा हा सन्मान आहे" महिलांना आज विविध क्षेत्रात जो मान मिळत आहे याचे श्रेय फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते व आपण सगळया त्यांच्याच लेकी आहोत असे संबोधन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा गुण गौरव केला. तसेच उपस्थित सर्व महिलांना बचत गटाच्या माध्यमातून महिला कशा सक्षम बनु शकतात याबाबत व स्वतःच आत्मपरिक्षण करून स्वता:ला कसे सिद्ध करायचे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सामाजीक चळवळीचेदृष्टीने भ्रूणहत्या टाळणे व एक सक्षम आई बनणे कसे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच अध्यक्षीय मनोगतात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष  अरविंद गोरे  यांनी आंबेडकर कारखान्यात महिलांचाही वाटा आहे आणि त्याचे स्मरण म्हणुन हा   कार्यक्रम आयोजीत केला आहे. तसेच सर्व महिला सभासदांनी शेती व्यवसायात सक्षम होणेसाठी माहे फेब्रुवारी २०२३ मध्ये गावोगांव महिला शेतकरी मेळावे घेणेत येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पुढील हंगामांत मजुरांची अडचण भासणार असल्याने ८० टक्के गाळप हार्वेस्टरने करणार असल्याचे प्रतिपादन केले.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक  आयुबखाँ पठाण यांनी केले तर प्रास्ताविक कारखान्याचे संचालक  अॅड. निलेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन  अभिजीत माने यांनी उपस्थित महिला सभासद उपस्थित पाहुणे, संचालक मंडळ सदस्य, कारखान्याचे अधिकारी / कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.  


 
Top