उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबाद शहरातील भीमनगर येथून चोरीच्या ५ मोटारसायकसह दोघांना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन  स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने  उस्मानाबाद तालुक्यात मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्या कामी गस्तीस होते.गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद शहरात असतांना पथकास गोपणीय माहिती मिळाली की, भीमनगर उस्मानाबाद येथील शंकर खंडू पेठे  व गणेश बबन लोंढे दोघेही रा. मोहमदवाडी रोड पुणे हे दोघे एक चोरीची मोटर सायकल कोठेतरी विक्री करण्याच्या हेतुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात थांबून आहेत यावर पथकाने लागलीच नमूद ठिकाणी धाव घेतली असता.संशयास्पद एका मोटारसायकल सह दोन पुरुष थांबलेले आढळले पथकाने त्यांची उपरेक्त प्रमाणे नाव गाव सागिंतले त्यांच्या कडे अधिक तपास केला असता त्यांच्या जवळील मोटरसायकल सह अशा  एकुण 5 मोटरसायकल  मिळून आल्या. तसेच सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास केला असता सदर मोटरसायकली चोरीस गेल्यावरून उस्मानाबाद जिल्ह्यातील आनंदनगर पो.ठा. गुरनं 28/2022 उस्मानाबाद शहर 41/2021 यासंह पुणे जिल्ह्यातील हाडपसर पो.ठा. गुरनं 1323/2022, वानवडी पोठा गुरन 256/2022 तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील एम.आय.डी.सी.वाळूज पो.ठा. 83/2022 कलम 379 अंतर्गत चोरीस गेल्यावरून नोंद असल्याचे समजले. यावर पथकाने त्या दोघांना ताब्यात घेऊन चोरीच्या 5 ही मोटरसायकल हस्तगत केल्या.तसेच पुणे पोलीस व औरंगाबाद पोलीस यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.


 
Top