उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कळंब पोलिसांनी शहरातील तीन ठिकाणे छापे टाकले. यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटख्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुटख्याची किंमत 3 लाख 55 हजार 280 रूपये आहे.
कळंब शहरातील मदिना चौकातील शुभम किराणा स्टोअर्स व सावित्रिबाई फुले शाळेमागील एका गोदाम अशा तीन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. प्रथम मदिना चौक येथील शुभम किराणा स्टोअर्स येथे छापा टाकला असता श्रीनिवास सत्यनारायण करवा हे 19 हजार 090 रूपये किंमतीचा विविध कंपनीचा गुटखा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ बाळगलेले आढळले. तर सावित्रिबाई फुले शाळेमागे शुभम श्रीनिवास करवा एका ठिकाणी तसेच रूपेश विष्णूदास मालपाणी व मनोज झुबारलाल मालपाणी हे जवळज एका गोदामामध्ये 3 लाख 36 हजार 190 रूपये किंमतीचा विविध कंपनीचा गुटखा असा एकूण 3 लाख 55 हजार 280 रूपये किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ बाळगलेले आढळले. पथकाने नमूद सर्व ठिकाणचा गुटखा जप्त केला आहे. श्रीनिवास करवा, शुभम करवा, मनोज मालपाणी व रूपेश मालपाणी या सर्वांनी संगनमत करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केली.
पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त व्यक्तींविरूद्ध कळंब पोलीस ठाण्यात भादंसं कलम 328, 272, 273, 34 अंतर्गत 10 जानेवारी रोजी गुन्हा नोंदविला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून सहायक पोलीस अधिक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पुजारवाड, साबळे, पोलीस अंमलदार अंभोरे, मंदे, चव्हाण, शेख यांच्या पथकाने केली.