उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय उस्मानाबाद व जिल्हा पोलीस विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक  11 जानेवारी 2023 ते  17  जानेवारी 2023 या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे. सदरील अभियानाचा उद्घाटन समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसर ,उस्मानाबाद येथे आज दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी सकाळी  9.00  वाजता उद्घाटन जिल्हाधिकारी  डॉ. सचिन ओंबासे  यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  गजानन नेरपगार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग  एस के चव्हाण,   विभाग नियंत्रक  श्रीमती चेतना खेरवाडकर, अध्यक्ष व्यापारी महासंघ  संजय मंत्री,  माध्यमिक शिक्षणाधिकारी  गजानन सुसर  तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ,सोलापूर अनिल विपत, व वाहतूक नियंत्रक शाखा व महामार्ग पोलीस यांचे अधिकारी तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमास श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील एकूण २०० विद्यार्थी उपस्थित होते.

 प्रथमता जिल्हाधिकारी डॉ.  सचिन ओंबासे  यांनी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . तसेच उपस्थित मान्यवरांचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गजानन नेरपगार ,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी अपघाताची कारणे व त्यावरील उपाय , रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी व पाळावयाचे नियम या बाबींचा उल्लेख केला . विद्यार्थी दशेत रस्ता सुरक्षा विषयक माहिती प्राप्त करून घेतल्यास भविष्यकाळात मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळता येतील याबाबत मार्गदर्शन केले . तसेच रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती वाहतूक नियमांचे पालन याबाबत माहिती दिली.

 अध्यक्षीय भाषणात माननीय डॉ  श्री सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी उपस्थितत्ताना रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन केले. रस्ते अपघातास आळा घालण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक असलेले विशेषतः रात्रीच्या वेळेस केले जाणारे प्रवास टाळण्यात यावे. वाढत्या मृत्यूच्या संख्येबाबत चिंता व्यक्त करून वाहन चालवताना चालकास सर्व वाहतूक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे‌ तसेच रस्ता सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्याचे संस्कार हे बालवयातच प्रत्येकावर रुजवणे ही काळाची गरज असल्याचे नमूद विविध महाविद्यालय/ शाळा येथे रस्ता सुरक्षा विषयक व्याख्याने आयोजित करावे तसेच प्रत्येक दुचाकी स्वाराने हेल्मेट वापरावे, कारचालकांनी सीट बेल्ट लावावे, वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे व अपघात होऊ नये म्हणून स्वतःच दक्षता घ्यावी‌ कारण कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 शेवटी श्री राहुल जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थी वाहतूक संघटना ,मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व कार्यालयातील सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप जगताप यांनी केले.


 
Top