उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.

 या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयानुसार दि.08 मार्च-2017 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्हयातील इच्छुक अनुसूचित  जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी http://mto.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर आपला ऑनलाईन अर्ज भरुन त्याची सत्यप्रत दि.12 फेब्रुवारी-2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद या कार्यालयास सादर करावी,असे आवाहन समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त  बी.जी.अरवत यांनी केले आहे.


 
Top