उस्मानाबाद / प्रतिनिधी

 जागतिकिकरणात चांगली संस्कारी असणारी संयुक्त कुटुंब पध्दती आपण संपवली आणि विभक्त कुटुंब पध्दतीमुळे माणसं  नात्याला पोरकी झाली त्यामुळे नात्यातला मायेचा ओलावा संपला, सध्याच्या स्पर्धेच्या युगात माणसं पैशाच्या मागे धावत आहेत जगण्यासाठी पैसा लागतो परंतु त्यासाठी माणसं येवढी व्यस्त झालीत कीनातेसंबंधच संपलेत,आपल्या मूळ गावाला पोरके झाल्यामुळे लग्नं जमवतांना अनंत अडचणी येताहेत त्याचबरोबर मुलांच्या घरच्याकडून मुलीबद्दल भरमसाठ अपेक्षा वाढल्या आहेत.मुलींच्या घरच्याकडून मुलाबद्दल खूपच अपेक्षा वाढल्याने व मूलगा नोकरदारच हवा या हव्यासापोठी मुला —मुलींची लग्ने जमेनात त्यामुळे आईवडीलांनी लग्नाबद्दलच्या मुलावर अवास्तव अपेक्षा लादू नयेत असे प्रतिपादन  राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था,उस्मानाबाद संचलित राजगीर वधू—वर सुचक मंडळ उस्मानाबाद द्वारा आयोजित "बौध्द व इतर धर्मीय वधू—वर परिचय मेळाव्यात" दि.२९जानेवारी रोजी , रायगड फंक्शन हाॅलमध्ये  प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना प्रा.राजा जगताप(मराठी विभाग,आर.पी.काॅलेज,उस्मानाबाद)यांनी केले आहे.अध्यक्षस्धानी मा.कैलासजी शिंदे (उपाध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक)हे होते.मंचावर वधू वर सुचक मंडळाचे अध्यक्ष नागनाथ लिंबा गोरसे,उपाध्यक्ष रोहिदास भगवान  झेंडे,सचिव धनंजय रोहिदास वाघमारे,अनुरथ राजाराम नागटीळक आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी छञपती शिवाजी महाराज,म.फुले,छञपती शाहू महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर या महापूरूषांच्या प्रतिमांचे पूजन केले.

पुढे बोलतांना प्रा.जगताप म्हणाले की,आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या,करीयर करेपर्यंत त्यांना साथ द्या,सगळ्यात महत्वाचे म्हणजे लग्न जमवतांना सुव्यवस्थित जोडीदार वाटत असेल तर लगेच लग्नाला होकार द्या,हुंडा पध्दती झुगारून द्यावी,व कोकणात ज्या पध्दतीने स्ञी—पुरूष समानता आहे त्या पध्दतीने मुलांना मोकळीक द्या त्यांना स्वताच्या पायावर उभे राहाण्यासाठी बळ द्यावे, जेणेकरून मुला—मुलींची लग्नाचे वय होऊन जाणार नाही.राजगीर वधू वर सुचक मंडळ आता सर्व धर्मीय 'वधू वर परिचय मेळाव्यांचे आयोजन करून नवे नातेसंबंध निर्माण करण्याचे पविञ काम करत असल्याने व पारदर्शकपणे कार्य पार पाडत असल्याने मंडळाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.या मेळाव्यातून अनेक लग्न जमावित असे शेवटी त्यांनी आवाहान केले आहे. अध्यक्षीय समारोप करताना कैलासजी शिंदे म्हणाले की,राजगीर वधू वर मंडळाने आजचा वधू वर परिचय मेळावा  बौध्द व इतर धर्मीय युवक युवतीसाठी घेऊन एक चांगले पाऊल ऊचलले आहे.यातून अनेकांची लग्ने जमणार असल्याने समाधान मिळणार आहे.आज मुलामुलींच्या लग्नात अनेक अडथळे येताहेत ते दूर करण्याचे काम हे मंडळ करत आहे.यातून जी लग्ने जमतील व कांहीची परिस्थिती नाजुक असेल तर त्यांच्यासाठी सामुदायक पध्दतीने लग्न लावण्यासाठी मी सहकार्य करेन व या मंडळाला गरज भासेल त्यावेळी मी मदत करायला तयार आहेअसे अश्वासन दिले आहे. मेळाव्यासाठी सर्व धर्मीयातील वधू वर व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष रोहिदास झेंडे यांनी केले.निवडक वधू वरांचा परिचय अनुरथ नागटिळक यांनी करून दिला.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी,मंडळाचे धनंजयवाघमारे,संपतभाऊ शिंदे,बळभीम कांबळे,रमेश कांबळे,पांडूरंग आल्टे आदींनी प्रयत्न केले. सूञसंचालन मंडळाचे राजेंद्र दामोदर आंगरखे यांनी केले.


 
Top