उस्मानाबाद /  प्रतिनिधी- 

तालुक्यातील बेंबळी येथे कलाविकास गणेश मंडळ मंदिरात बुधवार दि. २५ जानेवारी रोजी श्री गणेश जन्मोत्सव सोहळा पारंपािरक पध्दतीने विविध धार्मिक कार्यक्रमांने भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

बेंबळी पंचक्रोषीत आजोबा गणपती नावाने ओळख असलेल्या मंदिरात  पूजेचे मुख्य यजमान श्री व सौ सुनिल लक्ष्मणराव वेदपाठक याच्यासह एकुण पाच जोडप्यांनी  महाअभिषेक, गणेश  याग, होमहवन, अर्थवशिर्ष, गुलालोत्सव, जन्मोत्सव, पाळणा महानैवेद्य, महाप्रसाद इत्यादी विधी संपन्न केल्या.   मुख्य यजमान श्री सुनिल वेदपाठक , प्रसाद पाटील,भुषण बंदर, उमाकांत रेडेकर, हनुमंत झमकडे आदींची पूजा विधी संपन्न झाला. सर्व पुजेचे पौरोहत्य श्री गोपाळ जोशी महाराज यांनी केले. 

सर्व धार्मिक कार्यक्रमास संयोजक संजय वेदपाठक, बाबा कणसे, बाळासाहेब पुजारी,  पप्पू मोटे,आकाश डोणे,नितीन डोणे,विकास शिंदे, वासुदेव पाटील,जयकुमार तेलगावकर, नितिन मोटे, संतोष हिंडुळे,हरी तेलगावकर,सुधाकर भोजने व समस्त मंडळाचे पदाधिकारी व युवक वर्ग सर्व गणेश भक्त इत्यादीनी केले.

 
Top