उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्‍यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेच्या योजनाचा 2022-23 चा मान उस्मानाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना मिळालेला आहे.

 या स्पर्धा 14, 17 आणि 19  वर्षाखालील मुले-मुली या वयोगटाच्या आहेत. दि.06 ते 09 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कळंब तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहेत. स्पर्धेसाठी एकूण आठ विभागातून 288 मुले, 288 मुली, 48 संघव्यवस्थापक आणि 30 पंच उपस्थित राहणार आहेत.

 या स्पर्धा पाहण्याचा आनंद जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

 
Top