उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्‍यस्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेच्या योजनाचा 2022-23 चा मान उस्मानाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना मिळालेला आहे.

 या स्पर्धा 14 वर्षाखालील मुले-मुली या वयोगटाच्या आहेत. दि.17 ते 19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम येथे संपन्न होणार आहेत. स्पर्धेसाठी एकूण आठ विभागातून 96 मुले, 96 मुली, 8 संघव्यवस्थापक आणि 10 पंच उपस्थित राहणार आहेत.

  या स्पर्धा पाहण्याचा आनंद जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. 


 
Top