उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र  मोदी  सन २०१८ पासून परिक्षेवर चर्चा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यावरील परिक्षेचा तान दूर करण्यासाठी आपले अनुभव व तनाव दूर करण्याचे मार्ग सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहेत. परिक्षापे चर्चा या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रमध्ये चित्रकला परिक्षाचे आयोजन होत आहे. आज दि.२४ जानेवारी रोजी धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कुल व शरद पवार हायस्कुल येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या चित्रकला स्पर्धेचे उदघाटन लोकनेते आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भारत मातेचे पुजन करुन करण्यात आले. उदघाटनापर भाषणात बोलतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हीड क्षेत्रात केलेले वैष्वीक कार्य तसेच जी-२० च्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आपल्या कार्यातून ठसा उमटवला आहे. युवक व ‍विद्यार्थी हे उज्वल भारताचे भविषय आहे ते जाणून त्यांच्या उज्वल भविषयासाठी ध्येय धोरणे आखत आहोत, असे प्रतिपादन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

  या चित्रकला स्पर्धेमध्ये ३२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बेटी बचाव, बेटी पढाओ, जी-२० भारताची भुमिका, सर्जिकल स्ट्राईक, आत्मनिर्भर भारत, कोरोना लसीकरणामध्ये भारत नं.१, पंतप्रधानांच्या जन सेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, चुलेतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला, मोदींचा संवेदनशिल निर्णय, अंतराष्ट्रीय योगदिन मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष, आझादी का अमृत महोत्सव इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्रकला सादर केली.

  या स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्यावतीने करण्यात आले होते. ही स्पर्धा संपूर्ण धाराशिव जिल्हयामध्ये विविध ठिकाणी यशस्वीपणे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ही चित्रकला स्पर्धा आयोजित करत आहे.

 यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्र.का.स.सुधीर पाटील, नय्यर जहागीरदार, सुषांत भुमकर, अभिराम पाटील, रोहित देशमुख, सुनील पंगुडवाले, जगदिश जोशी, प्रसाद मुंडे, अर्जुन पवार, शंकर मोरे, धनराज नवले, नवनाथ सोलंकर, प्रशालेचे मुख्याध्याप श्री.एस.एस.देशमुख, श्रीमती पवार मॅडम, श्रीमती धावने मॅडम, श्रीमती देशमुख मॅडम, श्री.गोरे एन.एन., श्री शेटे टी.पी., श्री.विवेक कापसे, श्री.महेश राजे, श्री.शेषेनाथ वाघ, श्री.मनोज डोलारे यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


 
Top