उमरगा/ प्रतिनिधी-

तालुक्यातील दाळिंब सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्चस्व शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख सुरेश वाले यांचे जेष्ठ बंधू दत्तात्रय वाले यांची  चेअरमन तर दिगंबर जाधव यांची  व्हाईस चेअरमन पदी सोमवारी (दि १६) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. 

येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी १३ जागेसाठी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली दि.१६ रोजी झालेल्या बैठकीत नुतन संचालक मंडळ उपस्थित राहून दतात्रय वाले व दिगंबर जाधव यांची  निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून एस.जी. माळी,सेक्रेटरी विष्णु भगत यांनी काम पाहिले.नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे खासदार ओमप्रकाश राजेंनीबाळकर, जिल्हा अध्यक्ष आमदार कैलास पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

यावेळी नुतन संचालक कुतूबसाब शेडमवाले, निव्रती मोटे,आशोक आर्जुनकर, रमेश भोसले,आयाज शिलार ,सुर्यवर्धन गुंड,सुरेश देवकते, बालाजी पाटील,चंद्रहर्ष बनसोडे, विनोद ईगळे, प्रेमनाथ सलगर हे उपस्थित होते या निवडीसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी पंचायत समिती सभापती सुरेश वाले, किशोर जाधव,स्वप्नील वाले,योगेश भोळे, शांतेश्वर म्हेत्रे, विजय फडताळे आदी उपस्थित होते.

 
Top